Archana Patil

वास्तुशास्त्र या विषयात रुची निर्माण झाल्याने त्यावरील अनेक पुस्तके व लेख वाचून झाले परंतु काहीतरी अपूर्ण आहे असे वाटत रहायचे म्हणून वास्तुरविराजमध्ये अ‍डमिशन घेतल्यावर जाणवले की डिटेलिंगमध्ये वास्तुशास्त्र शिकणे किती महत्त्वाचे आहे. वास्तुरविराजमध्ये वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम हा खूप अ‍क्युरेट (परफेक्ट) आहे. प्रत्येक गोष्टींचे खुप डिटेलिंग केले आहे ते इतरत्र कुठेही पहावयास मिळत नाही. केवळ पुस्तके वाचून आपल्याला वास्तुशास्त्र समजते हा भ्रम किती खोटा आहे हे वास्तुरविराजमध्ये आल्यावर समजते. रविराज सरांचा, मंजुश्री मॅडमचा रिसर्च किती खोल आहे याची कल्पना आपल्याला या अभ्यासक्रमात येते. मी दादरला Jan 2019 च्या बॅचची विद्यार्थीनी आहे. सुरुवातीला माझा काही गोष्टींवर विश्‍वास नव्हता परंतु जस जसा अभ्यासक्रमपुढे सरकत होता, सरांशी प्रत्यक्ष संवाद साधता येत होता. तस तसा माझा विश्‍वास बर्‍याच गोष्टींवर बसायला लागला. सरांची या विषयातील उंची एवढी प्रचंड होती की आमच्यासारख्या सामान्य विद्यार्थ्यांना त्या उंचीकडे बघतानांच भोवळ येत होती. डबक्यातले बेडूक असल्यासारखे आम्ही या विशाल समुद्रात जरा भांबावून गेलो. परंतु वास्तुरविराजमधले मार्गदर्शन सहज सोपे कम्युनिकेशन यामुळे आमच्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला. वास्तुरविराज तर्फे प्रत्येक विद्यार्थ्याला एक होम व्हिजिट फ्री असते. मी आमच्या घराची वास्तुव्हिजिट न घेता ऑफिसची घेतली कारण आमच्या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येत होते. दादरला नविन ऑफिस घेतल्यामुळे हे प्रॉब्लेम येत आहेत का? याबाबत साशंकता होती. व्हिजिटच्या वेळी समजले की मिस्टरांची केबिन ब्रम्हतत्त्वात येत होती आणि ते ब्रम्हस्थानातच बसत होते. राजेश शिंदे सरांनी त्यांच्या केबिनची दिशा बदलायला सांगून ती SW मध्ये घ्यायला सांगितली, ब्रम्हतत्व मोकळे करायाला सांगितले बाकी गोष्टींसाठी योग्य दिशा सांगितल्या, योग्य रेमिडिज् वास्तुरविराज परिवारातून आल्या. यासगळ्यांचा पॉझिटिव्ह इफेक्ट झाला. आमचा विश्‍वास वाढला म्हणून आम्ही आमच्या बांदरा येथील दोन ऑफिसची (स्टुडिओ) वास्तु व्हिजिट करुन घेतली. ग्राऊंड फ्लोअरची जागा फारशी पॉझिटिव्ह नव्हती तन्वी यादव मॅडम यांनी योग्य दिशा सांगून रेमिडिज् दिल्या. दादर ऑफिसमध्ये काही स्ट्रक्चलर चेंजेस करावे लागले त्यामुळे बांदरा ऑफिसमध्ये रेमिडिज् करायला थोडा वेळ लागला. पहिल्यांदा आम्ही First Floor च्या रेमिडिज् केल्या त्याचा लगेचच पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला लागल्यामुळे आम्ही ग्राऊंड फ्लोअरसाठी ती जागा अ‍क्टिव्ह व्हावी म्हणून भूषणसर यांना अजून काही रेमिडिज् द्या म्हणून विनंती केली. वास्तुरविराज परिवारातर्फे योग्य त्या रेमिडिज् केल्या गेल्या. मिस्टरांसाठी योग्य ते ब्रेसलेट दिले गेले त्यामुळे आम्हाला जलदगतीने रिझल्ट मिळायला लागले. वास्तुरविराज पूर्ण परिवाराचे खुप खुप शतश: आभार.