Vittal Phadtare

वास्तुशास्त्राबद्दल थोडीफार माहिती होती, विविध माध्यमांतून माहिती प्राप्त होत होती परंतु एक दिवस लोकसत्ता या वर्तमानपत्रात एक लेख आला होता व तो संपूर्ण वाचल्यानंतर विचार पक्का झाला की आता आपण वास्तुरविराज या संस्थेचा वास्तुशास्त्र कोर्स (अभ्यासक्रम पूर्ण करायचा) चौकशी केल्यानंतर योग्य तो प्रतिसाद मिळाला व हा अभ्यासक्रम मी जॉईन केला. सुरवातीला मनात खुप विचारांचे काहूर होते, परंतु हळूहळू सर्व प्रश्न उलगडत गेले, सर व मॅडम यांचे मार्गदर्शन मिळत गेले. सरांनी तयार केलेला अभ्यासक्रम हा खरोखरच एक उत्तम वास्तुतज्ज्ञ घडविणारा आहे. याची मला पूर्णपणे खात्री झाली. अतिशय सुंदरपणे सरांनी सोप्याकडून हळूळहू अवघडाकडे नेलेला हा अभ्यासक्रम शेवटपर्यंत अवघड वाटूच दिला नाही. उत्तम व यशस्वी वास्तुतज्ज्ञ होण्यासाठी जे-जे काही आवश्यक आहे ते-ते सर्व आम्हांला याठिकाणी मार्गदर्शन मिळाले व समाजात आम्हाला आणखी एक नवीन ओळख निर्माण करुन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वास्तुरविराज परिवारामुळे प्राप्त झाले आहे. वास्तुरविराज ही एक वास्तुशास्त्र संस्था नसुन हे एक परिवार आहे असे आम्हांस जानवले प्रत्येक समस्येचे निराकरण याठिकाणी होते. सर व मॅडम स्वत: अतिशय तन्मयतेने भेट देवून, संवाद साधून मार्गदर्शन करतात. वास्तुरविराज परिवारातील प्रत्येक व्यक्ति (स्टाफ) हा अतिशय प्रामाणिक व वाखाण्याजोगे काम करतो आहे. हे हि वारंवार प्रत्यक्षास आले. सर्वात महत्त्वाचे एक यशस्वी पुरुषामागे एक यशस्वी स्त्री चा वाटा असतो त्याप्रमाणेच मॅडमचा यात खुप मोठा वाटा आहे. हे वारंवार प्रत्ययास आले. यातुन आम्हांस खुप काही शिकावयास मिळाले एक नवीन यशाचा राजमार्ग आम्हांद वास्तुरविराज परिवारामुळे प्राप्त झाला आहे हे अतिशय महत्त्वाचे सत्य आहे. वास्तुरविराज अभ्यासक्रम सुरु केल्यापासुन अतिशय महत्त्वाचे म्हणजे प्रचंड सकारात्मकता (Positive) वाढली व महत्त्वाचे म्हणजे अध्यात्मिक बैठकही पक्की होत गेली आहे. परंतु अजुनही काही गोष्टी शिकणे महत्त्वाचे आहे.